Latest Post


होंडाने बीएस-6 मानक इंजिनसह नव्या लूकमध्ये आपली लोकप्रिय स्कूटर होंडा डिओला लाँच केले आहे. ही स्कूटर स्टँडर्ड आणि डीलक्स अशा दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. यातील स्टँडर्ड व्हेरिएंटची किंमत 59,990 रुपये आणि डीलक्स व्हेरिएंटची किंमत 63,340 रुपये आहे.
बीएस-4 इंजिन मॉडेलच्या तुलनेत नवीन मॉडेलची किंमत 7 हजार रुपये अधिक आहे. नवीन स्कूटरमध्ये इंजिनसह लूकमध्ये देखील बदल करण्यात आलेला आहे.
नवीन होंडा डिओमध्ये बीएस-6 मानक 110सीसी इंजिन देण्यात आलेले आहे. हे इंजिन 8000 आरपीएमवर 7.79एचपी पॉवर आणि 5,250आरपीएमवर 8.79एनएम टॉर्क निर्माण करते. कंपनीने या स्कूटरमध्ये सायलेंट स्टार्ट फीचर देखील दिले आहे.
नवीन डिओमध्ये फूल-डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर देण्यात आलेले आहे. यामध्ये रेंज, मायलेज, रिअल-टाइम मायलेज आणि सर्व्हिस ड्यू इंडिकेटर सारखी माहिती मिळेल. यामध्ये पर्यायी साइड-स्टँड डाउन इंजिन इन्हॅबिटर फीचर देखील देण्यात आले आहे. हे फीचर असल्यावर जर स्कूटरचे साइड स्टँड खाली असेल, तर स्कूटर चालू होणार नाही. याशिवाय पास-लाइट स्विच, एक्सटर्नल फ्यूल फिलर कॅपसारखे फीचर्स देखील मिळतील.
या स्कूटरमध्ये नवीन एलईडी, मॉडर्न टेललॅम्प डिझाईन, स्पिलट ग्रॅब रेल्स, शार्प लोगो आणि नवीन बॉडी ग्राफिक्स देण्यात आले आहेत. नवीन मॉडेलमध्ये 12 इंचाचे फ्रंट व्हिल मिळतील. पुढील बाजूला टेलेस्कोपिक सस्पेंशन देखील मिळेल.
डिओच्या स्टँडर्ड व्हेरिएंटमध्ये अ‍ॅक्सिस ग्रे मॅटेलिक, कँडी जॅजी ब्लू, स्पोर्ट्स रेड आणि वायब्रेंट ऑरेंज रंगाचे पर्याय मिळतील. डीलक्स व्हेरिएंटमध्ये मॅट रेड मॅटेलिक, डॅझल येलो मॅटेलिक आणि मॅट अ‍ॅक्सिस ग्रे मॅटेलिक हे तीन रंग उपलब्ध आहेत.

प्रधानमंत्री किसान मानधन योजनेसाठी अर्ज करावेत परभणी, 

दि. 22 :- केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान मानधन योजना संपुर्ण देशात दि.9 ऑगस्ट 2019 पासुन सुरु करण्यात आली असून या योजनेअंतर्गत 18 ते 40 वर्ष वयोगटातील दोन हेक्टरपर्यंत शेती असलेल्या अल्पभुधारक व सिमांत शेतकरी नोंदणीसाठी पात्र आहेत. तरी आवश्यक कागदपत्रासह गावपातळीवरील आपले सरकार सेवा केंद्रामध्ये नोंदणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांनी केले आहे. प्रधानमंत्री किसान मानधन योजना भु-अभिलेखानुसार देशातील सर्व पात्र अल्प व अत्यल्प भुधारक शेतकऱ्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी सुरु करण्यात आली आहे. 


यामध्ये शेतकऱ्यांनी सातबारा, आठ अ, आधारकार्ड, बँकचे पासबुक, मोबाईल क्रमांक आदिची माहिती आपले सरकार सेवा केंद्रावर नोंदणी करण्यासाठी सोबत ठेवावेत. नोंदणीनंतर लाभार्थ्याच्या बँक खात्यातून लाभार्थी हिश्याची रक्कम ॲटो डेबीटने विमा कंपनीकडे जमा होणार आहे. केंद्र व राज्य शासनाचे कार्यरत व निवृत्त अधिकारी- कर्मचारी, सामाजिक सुरक्षा योजनांतर्गत लाभ घेणारे अल्प व अत्यल्प भुधारक शेतकरी, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेतील निवड झालेले शेतकरी, प्रधानमंत्री लघु व्यापारी मानधन योजनेतील शेतकरी, आयकर भरणारी व्यक्ती, नोंदणीकृत व्यावसायिक आदि प्रधानमंत्री किसान मानधन योजनेसाठी अपात्र आहेत. काही अडचणीअसल्यास तहसिलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. असे जिल्हाधिकारी, परभणी यांनी कळविले आहे.

जिल्हा प्रशासनाकडून निबंध स्पर्धेचे आयोजन 


परभणी, दि. 7 :- जिल्ह्याचा साहित्य आणि कला क्षेत्रातील वारसा लक्षात घेऊन जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांच्या संकल्पनेतून भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या औचित्‍याने नागरिकांसाठी 
जिल्ह्यातील साहित्य आणि कला क्षेत्रातील प्रभावी व्यक्तिमत्वे’ या विषयावर निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ऑनलाईन पध्दतीने रविवार दि.15 ऑक्टोबर 2019 पर्यंत प्रवेशिका सादर करावेत.

स्पर्धेसाठी प्रवेशिका फक्त ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असून त्याकरीता जिल्हा प्रशासनाने विज्ञान सुचना अधिकारी सुनिल पोटेकर यांच्या मदतीने एक स्वतंत्र पोर्टल विकसीत केले आहे. स्पर्धेसाठी प्रवेशिका फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्विकारण्यात येतील. युजर आयडी आणि पासवर्डची सुरक्षितता व गोप‍नीयता ही स्पर्धकाची जबाबदारी आहे. एका स्पर्धकास निबंध स्पर्धेसाठी जास्तीत जास्त दोन फाईल अंक दाखल करता येतील. स्पर्धा केवळ मराठी भाषेतच घेण्यात येणार असल्याने इतर भाषेत पाठविलेल्या प्रवेशिकांचा विचार केला जाणार नाही. स्पर्धेसाठी 900 शब्दांची शब्दमर्यादा आहे. स्पर्धेसाठी दाखल केलेले साहित्य आणि छायाचित्रावर सेतू समिती आणि जिल्हाधिकारी यांचा संपुर्ण अधिकारी राहील. हे साहित्य आणि कलाकृती कोणत्याही माध्यमातून प्रसिध्द करण्यात स्पर्धकाचा कोणताही हस्तक्षेप असणार नाही अशा नियम व अटी आहेत.
सहभागासाठी प्रथम स्पर्धकानेwww.collectorpbn.in संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी करण्यासाठी न्यु रजिस्ट्रेशन या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपले नाव आणि इतर माहिती नोंदवावी. निबंध स्पर्धेत प्रथम 2 हजार रुपये व प्रमाणपत्र, द्वितीय  1 हजार रुपये व प्रमाणपत्र आणि तृतीय येणाऱ्या व्यक्तीस 500 रुपये व प्रमाणपत्र परभणीचे जिल्हाधिकारी यांच्या शुभ हस्ते वितरण समारंभात प्रदान करण्यात येईल. असे निवासी उपजिल्हाधिकारी परभणी यांनी कळविले आहे

परभणी, दि. 7 :- जिल्ह्यातील ग्रामपंचायत, शहराच्या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र नसलेल्या 169 ग्रामपंचायत व परभणी शहरातील 4 असे एकुण 173 केंद्र चालकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तरी इच्छुकांनी विहीत नमुन्यातील अर्ज बुधवार दि.18 सप्टेंबर 2019 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्षात सादर करावेत. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी केले आहे.
अर्जदारांचे आपले सरकार सेवा केंद्रासाठीचे अर्ज दि.18 सप्टेंबर 2019 रोजीपर्यंतचे ग्राह्य धरण्यात येतील. मंजुर करावयाच्या ग्रामपंचायतीच्या व वार्डाच्या केंद्राची यादी  व अर्जाचा विहीत नमुना जिल्ह्याचे संकेतस्थळhttps://parbhani.gov.in यावर प्रसिध्द करण्यात आला आहे. अर्जासोबत रहिवासी प्रमाणपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड, एमएससीआयटी प्रमाणपत्र व ओळखपत्र आदिच्या प्रती जोडाव्यात. अर्जदार शासकीय, निमशासकीय अधिकारी-कर्मचारी अथवा कंत्राटी कर्मचारी नसावा. केंद्रासाठी स्वत:ची जागा, भाड्याने असल्यास त्याबाबतची कागदपत्रे व भाडेपत्र जोडणे बंधनकारक आहे. अर्जदारांनी एकापेक्षा जासत अर्ज केल्यास प्रथम केलेला अर्ज ग्राह्य धरण्यात येईल. आपले सरकार केंद्रासाठी दि.18 सप्टेंबर 2019 नंतर प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. असे निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी कळविले आहे

जिंतूर:-भाजप सरकारवर खरडून टिका करत हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे नसून या पाच वर्षात देशात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या झाल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या खासदार सौ.सुप्रियाताई सुळे यांनी केला. आज (ता.१०)संवाद यात्रेनिमित्त जिंतुर येथील जिल्हा परिषद मैदानावर करण्यांत आले. 


यावेळी आ. बाबाजानी दुर्राणी शिवचरित्र व्याख्याते प्रा.यशवंत गोसावी, छगन शेरे (प्रदेश उपाध्यक्ष संभाजी ब्रिगेड), सौ.उज्वलाताई विश्वनाथ राठोड (अध्यक्षा जि.प.परभणी ), सारंगधर महाराज, जि.प.सदस्य श्रीमती शालिनीताई शिवाजीराव राऊत, श्रीमती इंदूबाई आसारामजी घुगे, मीनाताई नानासाहेब राऊत, अरुणा अविनाश काळे, संगीता विठ्ठल घोगरे, नमिता संतोष बुधवंत, ममता मुरलीधर मते, अजय चौधरी, बाळासाहेब रोडगे यांच्यासह इंदुमती मधुकर भवाळे( सभापती प.स.जिंतूर) विजय खिस्ते (उपसभापती प.स.जिंतूर), सबिया बेगम कपिल फारुकी (अध्यक्षा न.प.जिंतूर) बाळासाहेब भांबळे आदि उपस्थित होते. 





पुढे त्या म्हणाल्या, की सरकारने केलेली नोटबंदी सपशेल फसली असून देशाची अर्थव्यवस्था यामुळे डबघाईस वरी असल्याचे त्या म्हणाल्या . सरकारने जनतेची दिशा भूल केली असून भाजपात सर्वात जास्त भ्रष्टमंत्री आहेत. येत्या निवडणुकीत जनता त्यांना माफ करणार नसून मतदारच त्यांना त्यांची जागा दाखवतील असा ठाम विश्वासदेखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. प्रकर्षाने महिलांच्या आडी आडचणी समजून घेतल्या.महिलांना सशक्त बनवण्यासाठी बचत गटांच्या माध्यमातून विविध कर्जे उपलब्ध करून देण्यासाठी आणखी शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचा त्यांनी विश्वास दिला. 



राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्रानी यांनी भाषणाच्या सुरवातीस ससंदरत्न खासदार सौ. सुप्रियाताई सुळे यांचा गुणगौरव केला. देशातील सरकार जातिवाद करण्यात गुंतलेले आहे. तसेच जिंतूर तालुक्यातील माजी आमदार यांनी शेतकऱ्यांचा पिकविम्यात अपहार केला होता. भाजपात गेल्याने त्यांनी मलीन प्रतिमा स्वच्छ होत असल्याची गमतीशीर फिरकी घेतली. 




आ.विजय भांबळे यांनी जिंतुरचा विकासाने काया पालट केला असून विरोधकांना बोलण्याची संधी राहिली नसल्याचे स्पष्ट केले. आ.विजय भांबळे यांनी आपले मनोगत व्यत्क करताना आपण निवडून आल्यापासून मतदार संघ कधीही सोडला नसून विविध योजनेच्या माध्यमातून मतदार संघात ५०० कोटी पेक्षा जास्त निधी खेचून आणला. तालुक्यातील रस्ते, शिक्षण, वीज, आरोग्य यासाठी आपण कमी पडलो नसून जनतेसाठी आपले दरवाजे सदैव उघडे आहेत . मतदारसंघातील काही लोक निवडणुकीपुरते मतदार संघात फिरत असून निवडणूक होताच ५ वर्षे गायब होतात.


'भारत हा तरूणांचा देश आहे, परंतु आज तरूणवर्ग मोठया प्रमाणावर 'सोशल मिडिया'त तल्‍लीन आहे. आपल्‍या आयुष्‍यातील अमुल्‍य वेळ सोशल मेडियावर वाया घालवत आहे. कोणताही संदेश विचार न करता या माध्यमातून पुढे पाठवत आहोत. यामुळे तरूणांमध्‍ये विचार करण्‍याचे सामर्ध्‍य कमी होत असल्याची खंत अविनाश भारती यांनी व्यक्त केली. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयात गणेशोत्‍सवानिमित्त मंगळवारी (ता.10) व्‍याख्‍यानाचे आयोजन करण्‍यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. 


कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी डॉ.आर.पी. कदम हे होते तर डॉ बी व्‍ही आसेवार, डॉ जे व्‍ही ऐकाळे, डॉ आर व्‍ही चव्‍हाण, गणेशोत्‍सव समिती अध्‍यक्ष अमर आमले, उपाध्‍यक्ष अभिजित पोरे आदींची उपस्थिती होती. युवा व्‍यक्‍ते श्री अविनाश भारती पुढे म्‍हणाले की, सोशल मेडियाचा वापर सकारात्‍मक कार्यासाठी करा. जीवनात कोणतेही यश प़्राप्‍त करण्‍यासाठी स्‍वत:शी व व वेळेशी प्रामाणिक रहा. आई-वडीलांना देवा समान माना. कृषिच्‍या विद्यार्थ्‍यांनी शेती व शेतकरी यांच्‍यासाठी कार्य करण्‍याची गरज असुन मातीशी व देशाशी इमान राखा, असा सल्‍ला त्‍यांनी दिला. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ आर व्‍ही चव्‍हाण यांनी केले तर सुत्रसंचालन अक्षय गोडभरले यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्या‍र्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget