सोशल मेडियाचा अयोग्‍य वापरामुळे तरूणांमधील विचार करण्‍याचे सामर्थ्य कमी अविनाश भारती यांचे प्रतिपादन


'भारत हा तरूणांचा देश आहे, परंतु आज तरूणवर्ग मोठया प्रमाणावर 'सोशल मिडिया'त तल्‍लीन आहे. आपल्‍या आयुष्‍यातील अमुल्‍य वेळ सोशल मेडियावर वाया घालवत आहे. कोणताही संदेश विचार न करता या माध्यमातून पुढे पाठवत आहोत. यामुळे तरूणांमध्‍ये विचार करण्‍याचे सामर्ध्‍य कमी होत असल्याची खंत अविनाश भारती यांनी व्यक्त केली. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयात गणेशोत्‍सवानिमित्त मंगळवारी (ता.10) व्‍याख्‍यानाचे आयोजन करण्‍यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. 


कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी डॉ.आर.पी. कदम हे होते तर डॉ बी व्‍ही आसेवार, डॉ जे व्‍ही ऐकाळे, डॉ आर व्‍ही चव्‍हाण, गणेशोत्‍सव समिती अध्‍यक्ष अमर आमले, उपाध्‍यक्ष अभिजित पोरे आदींची उपस्थिती होती. युवा व्‍यक्‍ते श्री अविनाश भारती पुढे म्‍हणाले की, सोशल मेडियाचा वापर सकारात्‍मक कार्यासाठी करा. जीवनात कोणतेही यश प़्राप्‍त करण्‍यासाठी स्‍वत:शी व व वेळेशी प्रामाणिक रहा. आई-वडीलांना देवा समान माना. कृषिच्‍या विद्यार्थ्‍यांनी शेती व शेतकरी यांच्‍यासाठी कार्य करण्‍याची गरज असुन मातीशी व देशाशी इमान राखा, असा सल्‍ला त्‍यांनी दिला. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ आर व्‍ही चव्‍हाण यांनी केले तर सुत्रसंचालन अक्षय गोडभरले यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्या‍र्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget